
केंद्र सरकारच्या दबावामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या अन्यायकारक, तुघलकी निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.
अंधेरी पश्चिम विधानसभेतील हजारो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर निषेध केला. विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, समन्वयक सुनील खबिया, वीणा टॉक, संजीवनी घोसाळकर, रंजना पाटील, भावना मांगेला यांच्यासह शिवसैनिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वडाळा विधानसभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक राकेश देशमुख, उपविभागप्रमुख विलास राणे, रवी घोले, महिला विभाग संघटिका सुनीता अहिरे, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, युवासेना विस्तारक अजय व्हनोळे, शाखाप्रमुख हमीद शेख, अभिषेक बासुतकर, युवासेना विभाग अधिकारी रितेश सावंत, मुकुंद पडय़ाळ, अनिकेत सकपाळ, विनोद भोपळे, स्वप्नील जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे पश्चिम विधानसभेच्यावतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विभागसंघटिका रजनी मिस्त्री, विधानसभा संघटिका शीतल शेलार, समन्वयक उषा भोजने, उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे, चिंतामणी निवाटे, सुरेश दुबे, विभाग अधिकारी अक्षय पनवेलकर, उपविभाग संघटक मनीषा फोंडे, माधुरी लाड, शाखाप्रमुख सुनील मोरे, प्रफुल घरत, पांडुरंग वाघे, संदीप मेटकर, सुनील जाधव, शाखा संघटक अल्का मंडलिक, साधना वरसकर, विशाखा उजगावकर, पल्लवी आरोळकर, वैशाली राऊत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

























































