सामान्य लोकांना न्याय देणारी ही शिवसेनाच – प्रा. नितीन बानगुडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

माझे शिक्षण नगर कॉलेज येथे झाले. सावेडी गाव मी पहिल्या पासून पाहत आलो ते आजही तसेच आहे. नवीन काही नाही. आपण सर्व या भागातील नागरिक नगर शहरात जाता. त्यासारखी सुविधा या सावेडी गावात तुम्हाला शिवसेना आणि शिवसेनेचे प्रतिनिधीच देऊ शकतात. कारण आतापर्यंत या भागात शिवसेनेचा नगरसेवक नव्हता. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी ही शिवसेना आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने नगरचे बिहार केले आहे. जनतेला कोटींची स्वप्न दाखवणाऱ्या भाजपाचे नगरचे कार्यालयच थकबाकीमुळे मनपाने सील केले आहे. जे लोक भाजप पक्षाला मानत नाहीत ते तुम्हाला काय जुमानणार आहेत. त्यामुळे जनताभिमुख कार्य करणाऱ्या शिवसेनेलाच मतदान करा, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते, शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी केले.

प्रभाग क्र.६ मधील सावेडी गांव येथील हनुमान मंदिर येथे शिवसेनेच्या जाहीर सभेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानगुडे. समवेत उपनेते अनिल राठोड, उमेदवार रवींद्र वाकळे, अर्जुन बोरुडे, सारिका भुतकर, पुष्पाबाई वाकळे शंकर वाकळे, भगवान वाकळे, की, सन वाकळे, हनुमंत भुतकर, भानुदास बारस्कर, बबन बारस्कर, बिभिषण आडोळे, वसंत आडोळे, अरुण वाकळे, आबा वाकळे, महादेव बारस्कर, की, शोर बारस्कर, दिलीप बारस्कर, नारायण वाकळे, मंदा वाकळे, अंजना वाकळे, सुजाता वाकळे, रत्नमाला वाकळे, यमुना वाकळे, गोरख बोरुडे,राहुल गुंड, दत्ता नागापुरे व परिसरातील नागरिकांसह महिला मोठ्या संखेत उपस्थित होत्या.

बानगुडे पुढे म्हणाले की, या ठिकाणी सावेडी गावात मोठ्या संख्येत महिला माता- भगिनींची उपस्थिती पाहून मला आनंद झाला. ज्या प्रभागातील माता-भगिनी सजग असतात त्या प्रभागाचा विकास कोणी रोखू शकत नाही. कारण सगळ्या अडचणींशी लढाई यांना करावी लागते. पाण्याशी संबंध त्यांचा येतो. स्वच्छतेशीही संबंध त्यांचा येतो. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी महिला जागरूक असल्या तर त्या प्रभागातील विकास झाल्याशिवाय राहत नाही. मताचा अधिकार ज्यांनी सर्वांना समान दिला आज त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांनी सांगितले जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही तो पर्यंत मला झोपण्याची संधी नाही. ज्या समाजात अशी माणसे उभे राहतात त्या समाजाचा विकास होतो. बाबासाहेबांनी रात्र रात्र जागून राज्य घटना लिहीली आणि खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी काम कसे केले पाहिजे याचे उदाहरण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगितले.