विजय आपलाच! कितीही अफझल खान येऊ द्यात, शिवसेना घाबरणार नाही!! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफझल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार. विजय आपलाच होणार, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

धाराशीव येथील कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आपलं कुठंही काही वाकडं झालेलं नाही. भवानीमातेची कृपाच आहे आपल्यावरती. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. याआधीच्या न्यायालयाच्या निकालाने कोण खरं कोण खोटं हेदेखील दाखवून दिलं आहे. दसरा मेळाव्यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली होती, अशी आपली श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ही तलवार दिली आहे, तू लढ मी आहे पाठिशी. आज शिवसेना लढत असताना अनेकजण सोबत येत आहेत, त्यामुळे त्यांचं काwतुक आहेच, पुन्हा दसऱयाला आपण भेटणार आहोतच, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी धाराशीवमधील शिवसेना कार्यकर्त्यांना विश्वास दिला.

…तर एक मेळावा ‘मातोश्री’वरच झाला असता

वर्षा सोडून ‘मातोश्री’वर आल्यापासून अनेक शिवसैनिक ‘मातोश्री’वर येऊन भेटत आहेत. हे शिवसैनिक जर मोजले असते तर दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मेळावा ‘मातोश्री’वरच झाला असता. अनेकांचे फोन येताहेत, निरोप येताहेत. कुठे काहीही आपले वाकडे झालेले नाही. भवानी मातेची आपल्यावर कृपा आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

खस्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले

तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशीव जिह्यात येऊन कौतुक करायचे आहे. कारण पैलास पाटील यांनी काय पराक्रम केले सर्वांना माहीत आहे. ओमराजेदेखील कसा रक्त जाळतोय हे तुम्हीदेखील पाहिले आहे. जिथे लोकप्रतिनिधी घट्ट राहणारच. ज्यांना तुम्ही खस्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी आमदार पैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.