
पालघर आणि वाडा पंचायत समित्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा झेंडा फडकला आहे. या विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिंदाबाद च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
पालघर सभापतीपदी शैला कोळेकर विजयी झाल्या आहेत. तर वाडा सभापतीपदी अस्मिता लहांगे यांचा विजय झाला आहे. तर तलासरीमध्ये माकप, विक्रमगडमध्ये जिजाऊ संघटना, जव्हारमध्ये भाजप आणि मोखाडामध्ये शिंदे गटाचा विजय झाला आहे.



























































