
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये मान्यताप्राप्त कामगार संघटनेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत आरसीएफ कर्मचारी सेनेच्या पॅनलने भाजपप्रणीत आरसीएफ मजदूर संघ व काँग्रेसप्रणीत इंटकच्या पॅनेलचा दारुण पराभव करत मान्यताप्राप्त कामगार युनियन म्हणून बाजी मारली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, आरसीएफ कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर तर कार्याध्यक्षपदी आमदार-विभागप्रमुख विलास पोतनीस यांची निवड करण्यात आली आहे.
आरसीएफ कर्मचारी सेनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
अध्यक्ष गजानन कीर्तिकर (खासदार), कार्याध्यक्ष – विलास पोतनीस (आमदार), सहकार्याध्यक्ष-अशोक सोनवणे, सरचिटणीस-दत्तात्रय परब,
खजिनदार – श्रीकांत परब, उपाध्यक्ष – दगडू गढरी, विजय पालवे, उदय उजाळे, सतीश निकाळजे, व्रेसन्ट डिमेलो, भालचंद्र पाटील, नीलेश गावकर,
चिटणीस (युनिट) – सुनील पवार, सहखजिनदार – अशोक बासा, चिटणीस – संजय जोशी, जयप्रकाश सिंह, जीवन भोईर, वैभव घरत, सुयोग हाडवळे, विवेक कांडारकर, तृप्ती तटकरे-वरेकर, कार्यालयीन चिटणीस – प्रकाश मांडवकर, रवींद्र भालेकर, मंदार भोपी, संदीप गुंजाळ, सहचिटणीस-हरिश्चंद्र मुरुडकर, प्रमोद शिंदे.
रमेश वायदंडे, डी. आर. पवार, श्रीधर घाटे, पंकज कांबळे, विजय पेडणेकर, प्रशांत सावंत, सोनाली मांजरेकर, दुष्यंत बदक, प्राची वाघ, सुहास वायदंडे, पल्लवी पुजारी, स्वप्निल राणे, नितीन पाठारे, विठ्ठल बोराटे, योगेश ठाकूर, महिला सदस्य – स्वरदा तिर्लोटकर, अर्चना भुजंग, सुषमा सिंह, चारुता कुरकुटे, सुनीता वाघमोडे, शीतल पाटील, आरती रायगवळी, सुरेखा लोहकरे, कार्यकारिणी सदस्य – प्रदीप गावंड, आल्हाद महाले, सतीश वाघमारे, तानाजी अलदर, जितेंद्र सिंह, अविनाश शेळके, दीपक चव्हाण, अमोल राणे, नितीन म्हात्रे, रमेश वेताळ, सुशील मेस्त्री, करुणाकरण, हनुमंत मोती, दिलीप वाघ, शैलेश म्हात्रे, निलेश वर्देकर, नंदू राजगोपालन, जितेन चव्हाण, विसर्जन पाटील, गणेश परब, बोनी न्यून्स, प्रणीत म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, भास्कर पाटील.
आरसीएफ कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱयांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख-आमदार अनिल परब, विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस आदी उपस्थित होते.


























































