
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदारसंघातून अंकिता पटेल यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. अंकिता पटेल यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यानंतर अंकिता पटेल यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, सिल्वासा दादरा-नगर हवेली येथील काशीनाथ पावर, वीरल राजपूत आणि रमेश मोहिते हे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर त्या ही निवडणूक लढतील असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून सांगण्यात आले.































































