
हिंदुस्थानात ऍपलने आयफोन युजर्सला जोरदार झटका दिला आहे. ऍपलने आयफोन मॉडल्सच्या किंमती महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने रिटेलर्स आणि चॅनेल पार्टनर्सला मिळणारा डिमांड जनरेशन सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आयफोन 16 आणि आयफोन 15 सारखे मॉडल आता ग्राहकांना 5 हजार रुपयांनी महाग मिळतील. डिमांड जनरेशन सपोर्ट एकप्रकारे बॅकअँड इंसेटिव असते. याच्या मदतीने रिटेलर्स एमआरपी न बदलता ग्राहकांना आकर्षक डिस्काउंट देत होते. यामुळे आयफोन 15 आणि आयफोन 16 मॉडल स्वस्त मिळत होते. कंपनीने कॅशबॅक ऑफर्समध्येही कपात केली आहे. ग्राहकांना आधी 6 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळत होता. आता तो मिळणार नाही.

























































