
हिंदुस्थानच्या नेमबाजांची विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील देदीप्यमान कामगिरी शुक्रवारीही सुरूच राहिली. हिंदुस्थानच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण पदकांसह एक रौप्य व एक कास्य पदक पटकावत या स्पर्धेत पदकांची पंचविशी अर्थातच सिल्व्हर ज्युबिली साजरी केली. तेजस्विनी सावंत व स्वप्नील कुसळे या दोन महाराष्ट्राच्या नेमबाजांचा सुवर्ण पदक पटकावलेल्या संघात समावेश होता हे विशेष.
तेजस्विनी सावंतने संजीव राजपूतच्या साथीने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र प्रकारात युव्रेनच्या सेहरीय कुलीश व अॅना लीना या जोडीवर 31-29 असा विजय मिळवत सुवर्ण पदक जिंकले.
पुरुषांच्या प्रकारात चेन सिंग, स्वप्नील कुसळे व नीरजकुमार या जोडीने गोल्ड मेडल पटकावले. पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तोलमध्ये विजयवीर सिद्धूने रौप्य आणि तसेच सुनीधी चौहान व ऐश्वर्य सिंग यांनी कास्य पदकावर नाव कोरले.
























































