
सामना प्रतिनिधी । शिरुरअनंतपाळ
तालूक्यातील मौजे साकोळ येथे बाजारातील चार दुकाने चोरट्यांनी फोडली. एक सोन्या-चांदीचे आणि तीन किराणा दुकानांचा त्यात समावेश आहे.
शिरुर अनंतपाळ तालूक्यातील साकोळ येथिल आज पहाटे ४ वाजता अज्ञात चोरटाने ४ दुकानावर डल्ला मारला . आण्णा भाऊ साठे चौकात व्यापार लाईन असून अज्ञात चोरट्याने मंगळवार पहाटे ४ वाजता ३ किराणा दुकान व १ सोन्याचे दुकान फोडल्याची घटना घडली त्यात कोंडीब बिरादार यांचे सोन्याचे दुकानातून ५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केली. वजीर मुल्ला, नवनाथ डोंगरे ,रिजवान बागवान या तिघांच्या किराणा दुकानातून ४ हजार रोकड चोरली सदरील घटना cc tv मध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे साकोळ येते नागरिकात, व्यापारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे घटना घडली, पोलीसांनाही कळवण्यात आले परंतु सकाळी ११ वाजेपर्यत पोलीस प्रशासन घटनास्थळी पोलीस पोहचले नाहीत. तेव्हा चोरट्याना पकडून न्याय देण्यात यावा, अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे.






























































