दहिसरमध्ये सुगरणींचा तुडुंब उत्साह, थेपले-पराठ्यांचा खमंग घमघमाट

845

दहिसरच्या आनंद नगर येथील विद्यामंदिर शाळेत शनिवारी श्रावणसरी कोसळल्या त्या विविध स्पर्धा, बक्षिसे अन् मंगळागौर खेळातील अभूतपूर्व उत्साहाच्या. थेपलेपराठ्यांच्या खमंग घमघमाटात हा आनंद सोहळा रंगला. याला निमित्त होते ते उत्तरा मोने यांच्या संकल्पनेतील श्रावण महोत्सवाचे. तब्बल 183 महिला व पुरुष  ‘मास्टर शेफनी सहभागी होऊन महोत्सवात धम्माल आणली.

पीतांबरी रुचियाना प्रस्तुत, मिती क्रिएशन्स निर्मित, शिवसेना शाखा क्र. 1 यांच्या सहकार्याने दहिसर विधानसभा आयोजित उत्तरा मोने यांच्या संकल्पनेतील  ‘श्रावण महोत्सव 2019- उत्सव पाककलेचाउत्सव खाद्यसंस्कृतीचाविद्यामंदिर शाळेच्या पॅरेडाईज हॉलमध्ये रंगला. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम नीलम गोर्‍हे, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माधुरी भोईर, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, कर्णा अमीन, भालचंद्र म्हात्रे, विनायक सामंत, किशोर म्हात्रे, शकुंतला शेलार, दीपा पाटील, संध्या दोशी, रिद्धी खुरसुंगे, बाळकृष्ण ब्रीद, ऍड. अजित मांजरेकर, शुभदा शिंदे तसेच शाखाप्रमुख, शाखा संघटक व शिवसैनिक उपस्थित होते. या पाककला स्पर्धेतील स्पर्धकांनी विविध प्रकारच्या पौष्टिक थेपलेपराठ्यांना हिरव्या भाज्या, केळीच्या पानांची सजावट केली होती. दोन फेरीमध्ये झालेल्या परीक्षणातून प्राथमिक फेरीतील पाच विजेत्यांची निवड करण्यात आली. मुख्य परीक्षक म्हणून स्पर्धेच्या आयोजिका उत्तरा मोने, शेफ तुषार प्रीती देशमुख, न्युट्रीशनिस्ट नमिता नानल यांनी, तर परीक्षक म्हणून शिवानी नेमावरकर, डॉ. श्रीकृष्ण कुमार, कला जोशी, श्रीया जोशी, विजय कामेरकर, मनीषा मराठे, शुभांगी देवचके, पराग बापट, संगीता ढोले, रेशमा बाबरे, वैभव गोमसे, प्रथमेश वागळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली  वीरकर आणि नयन वालावलकर यांनी केले.

 महिलांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजेनीलम गोर्‍हे

महिलांना एकत्र आणले पाहिजे व त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. हे कार्य श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून घडतेय अशी दाद विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिली.

प्राथमिक फेरीतील विजेते

ममता सावंत, रचना कुलकर्णी, अनुजा मुळे, माणिक कोळी, रेखा वारंग यांनाटॉप फाईव्हम्हणून, तर उत्तेजनार्थ म्हणून हीना पंडय़ा, रेखा थांबे, अमेया पेठे यांना गौरवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या