‘श्री दत्त अवतार लीला’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन

ज्योतिषाचार्य माधव कुलकर्णी लिखित ‘श्री दत्त अवतार लीला’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्रीक्षेत्र कुरवपूर येथे गुरुद्वादशीच्या अत्यंत पवित्र आणि मंगलदिनी मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. या पुस्तकात दत्त संप्रदायातील प्रमुख दत्तावतार, दत्त संप्रदाय तसेच विविध दत्त स्थानांची अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे. दत्त भक्तांसाठी ही माहिती अमूल्य ठरणारी आहे.

दत्त संप्रदायासाठी महत्त्वाच्या असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन परमपूज्य गुरुनाथ बाबा दंडवते मठाचे (नांदेड) पीठाधीश प.पू. श्री योगीराज बाबा दंडवते महाराज यांच्या पत्नी गोपिका दंडवते यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकाची पहिली प्रत श्रीक्षेत्र कुरवपूरचे गुरुजी राजेंद्र भट यांच्या हस्ते श्री दत्त चरणी भक्तिभावाने अर्पण करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याला दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (मार्केट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, उद्योजक संजय आवारे, शिवाजीराव चोरमुले यांच्यासह डॉ. अपर्णा कल्याणकर, मधुरा कुलकर्णी, सुनील घैसास, शशांक घाटणेकर, नागेश इनामदार गुरुजी, सचिन सराफ, ओंकार धोंगडे, नरेश क्षीरसागर, भगवान परळीकर, दत्तात्रय माने, सीमा शिवकामत आदी उपस्थित होते. या पुस्तकासाठी संजय खानविलकर, दिवाकर परब, संजय आवारे आणि मुद्रक हेमंत साटम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.