क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याची भेट घेत याबाबत माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे लढतीत श्रेयस अय्यर जायबंदी झाला होता. त्याच्यावर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

नेमके झाले काय होते

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 34 वे षटक हर्षित राणा टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर अॅलेक्स कॅरी याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आणि उंच उडाला. याचवेळी बॅकवर्ड पॉइंटच्या मागून धावत आलेल्या श्रेयस अय्यर याने सूर मारून झेल पकडला. हा झेल घेताना तो पोटावर आदळला. यामुळे त्याला दुखापत झाली. तीव्र वेदनेने तो कळवळू लागला. अय्यरने झेल घेतल्याने कॅरी 24 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर अय्यरलाही मैदान सोडावे लागले.