13 वर्षांच्या श्रेयसने मूकबधिरांसाठी बनवले बोलणारे हातमोजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मूकबधिरांना संवाद साधणे सोपे व्हावे यासाठी सी. डी. बर्फीवाला या शाळेतील 13 वर्षीय श्रेयस विचारे या विद्यार्थ्याने स्पीकरच्या सहाय्याने बोलणारे हातमोजे तयार केले आहेत. त्याच्या या कामगिरीची दखल घेत अमेझॉन फ्युचर इंजिनीअर या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत श्रेयसला गौरविण्यात आले आहे.

नवकिरण मंडळ आणि कामगार नगर को-ऑप सोसायटीत राहणाऱया श्रेयसचा नुकताच कामगार नगर को- ऑप. हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवकिरण मंडळाचे सेव्रेटरी सुभाष राणे, सोसायटीचे सेव्रेटरी महेश बावले आदी उपस्थित होते. यापूर्वी शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्यातर्फे ‘अंधेरी महोत्सवा’त ‘गौरव अंधेरीचा’ या पुरस्काराने श्रेयसला सन्मानित केले होते.