
सामना प्रतिनिधी । नगर
छोटे-मोठे कार्यक्रम करण्यासाठी जागा नसल्याने अनेक अडचणी येत होत्या, परंतु समाजधुरींनी एकत्र येऊन एक चांगले पाऊल टाकले. समाजातील सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने आज ‘संताजी संकुल’ची देखणी वास्तू उभी राहिली आहे, यासाठी सर्वांनी जे योगदान दिले आहे, त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. या वास्तूंच्या रुपाने समाजाचे जे संघटन झाले आहे, ते महत्वाचे आहे. समाजातील लोकांना या संकुलचा उपयोग चांगल्या पद्धतीने होणार आहे. संत जगनाडे महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे. संतांचे विचार आत्मसात करुन जीवनात त्याचे आचरण करावे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने काम केले पाहिजे; तेव्हाच समाजाचा उद्धार होत होत असतो, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैंदर यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने तेलीखुंट येथे बांधण्यात आलेल्या ‘संताजी संकुल’च्या उद्घाटन बबनराव सैंदर, श्रीमती लक्ष्मीबाई बाबुराव डोळसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष प्रकाश सैंदर, प्रभाकर देवकर,प्रसाद शिंदे, सागर काळे, दत्तात्रय डोळसे, सचिन शेंदूरकर, मनोज क्षीरसागर, गोकूळ कोटकर, सुनंदा नागले, निता लोखंडे, गणेश लोखंडे, अशोक डोळसे, श्रीराम माकूडे, गणेश धारक, अर्जुन डोळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरमधील श्री संताजी भवन, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, दाळमंडई येथे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री तुकाराम महाराज गाथ्याचे लेखक श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप रामदास महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आले होते. या सप्ताहांतर्गत गाथा पारायण, भजन, हरिपाठ आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. हभप रामदास महाराज क्षीरसागर यांचे काल्याचे किर्तन झाले. नगरमधील चित्रकार अशोक डोळसे यांनी रेखाटलेल्या संताजी महाराज यांची प्रतिमा व पादुकांची भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे नेता सुभाष चौक येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी स्वागत केले. तसेच अर्बन बँक चौक येथे महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालनताई ढोणे, सुवेंद्र गांधी, सचिन जाधव आदिंनी स्वागत केेले. या मिरवणुकीमध्ये पारनेर येथील पिंपळनेरच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हभप गणेश महाराज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. यावेळी शौर्य ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवलिंग चौथे यांनी देवीची पूजा केली तर श्रीराम माकूडे यांनी श्रीखंडा अभिषेक केला. कार्यक्रमास सुरेश शिंदे, हरिभाऊ डोळसे, अनिल सैंदर, ओम नागले, गणेश म्हस्के, चंद्रकांत भागवत, साईनाथ वाल्हेकर, निशिकांत शिंदे, सागर सातपुते, लक्ष्मण डोळसे, बाळासाहेब हुच्चे, राजेंद्र धारक, मुरली दारुणकर, पवन साळूंके, अॅड.विनायक दारुणकर, मंगेश ढवळे, गणेश कोटकर, दिनेश सौर आदिंसह समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.






























































