या अभिनेत्रीची कूल कूल थंडीतली ‘हॉट’ अदा

सामना ऑनलाईन। श्रीनगर

कलर्स या वाहीनीवरील लोकप्रिय ‘उतरन’ या मालिकेत मुक्ताची भूमिका करणाऱ्या श्रीजिता डे या अभिनेत्रीचा हॉट लूक नुकताच समोर आला आहे. श्रीजिताने सोशल मीडियावर कश्मीरमधील तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात कडाक्याच्या थंडीत सोनेरी बिकीनी घालून उभी असलेली श्रीजिता खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या हॉट फोटोने चाहत्यांना पुरते घायाळ केले आहे. तिने 10 डिग्री सेल्सियस तापमानात हे फोटो शूट केले आहे.

photo

सोशल साईटवर सक्रिय असलेली श्रीजिता नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने साडी नेसून समुद्र किनाऱ्याजवळ उभे असलेले तिचे काही फोटो सोशल साईटवर पोस्ट केले. त्याला नेटकऱ्यानी तुफान प्रतिसादही दिला. त्याचदरम्यान तिने कश्मीरमधील बर्फात हे फोटो शूट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या