शुभमन गिलचा महापराक्रम, गावस्कर यांचा 50 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

टीम इंडियाचा तरुण फलंदाज शुभमन गिल याने अल्पावधीतच आपल्या बॅटचे पाणी विरोधी संघाला पाजले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पणाची संधी मिळालेल्या गिलने या संधीचे सोने केले आणि 3 कसोटीत 51 च्या सरासरीने 259 धावा केल्या. यात त्याने दोन अर्धशतकंही ठोकली.

ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक कसोटीतही गिलने 91 धावा चोपल्या. या अर्धशतकीय खेळीच्या बळावर त्याने सुनील गावस्कर यांचा 50 वर्षांपूर्वींचा विक्रम केला. सर्वात कमी वयात चौथ्या डावात 50 धावा करण्याचा विक्रम आता गिलने केला आहे. गिलने 21 वर्ष, 133 दिवसांचा असताना हा पराक्रम केला.

लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी 21 वर्ष, 243 दिवसांचा असताना अशी कामगिरी केली होती. सुनील गावस्कर यांनी 1970-71 ला वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पदार्पणाचा सामना खेळला होता. या सामन्यातील चौथ्या डावात त्यांनी नाबात 67 धावा केल्या होत्या.

दिग्गजांची बोलती बंद! टीम इंडियाने ‘करुन दाखवलं’, ते पण घासून नाही ठासून

गाबावर ऐतिहासिक विजय

गाबावर खेळलेल्या गेलेल्या निर्णयाक कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने पहिल्या डावात 336 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली आणि त्यांना दुसरा डाव 294 धावांमध्ये आटोपला. टीम इंडियापुढे विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य होते. स्टार्क, हेझलवूड, कमिन्स, लायन या गोलंदाजीपुढे खेळताना टीम इंडियाच्या नवख्या संघाने हे आव्हान पार केले आणि गाबावर ऐतिहासिक विजय मिळवला. 1988 नंतर यजमान संघाला येथे पहिल्यांदाच पराभव स्वीकारावा लागला.

INDvsAUS इतिहासाची पुनरावृत्ती! विराटच्या जन्माच्या वेळी जे घडलं तेच त्याच्या मुलीच्या जन्मवेळीही घडलं

आपली प्रतिक्रिया द्या