सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम सामन्यात सिकंदर शेख याने शिवराज राक्षे याचा पराभव करत हा 66 व्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आहे.

पुण्यातील लोणीकंद – फुलगाव येथे यंदाची 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू आहे. गत विजेता शिवराज राक्षे व सिकंदर शेख यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात सिकंदरने शिवराजचा पराभव करत विजय मिळवला

शिवराज राक्षे याने गेल्यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी सिकंदरचा हा किताब त्याला हुलकावणी देऊन गेला होता. मात्र यंदा त्याने या स्पर्धेत बाजी मारली.