सिम्बाची छप्पर फाड कमाई, चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

रणवीर सिंह , सारा अली खान आणि मराठी स्टार्सची मांदियाळी असलेल्या सिम्बा या चित्रपटाने तिसऱ्याच आठवड्यात छप्पर फाड कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत सिम्बाने शाहरुख खानच्या चैन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड तोडला आहे.

सिम्बाने आतापर्यंत फक्त हिंदुस्थानमध्ये 227.71 कोटींची कमाई केली आहे. यामुळे 28 डिसेंबरला प्रदर्शित झालेला सिम्बा ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या रांगेत जाऊन बसला आहे. भरपूर मसाला व मनोरंजन असलेला सिम्बा रोहित शेट्टीचा सर्वाधिक कमाई करून देणारा चित्रपट ठरला आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी टि्वटरवर सिम्बाच्या कमाईची माहिती दिली आहे. सिम्बाने रोहित शेट्टीच्या चैन्नई एक्सप्रेसला मागे टाकले आहे. तिसऱ्या आठवड्यातच चित्रपटाने 2.60 कोटी, शनिवारी 4.51 कोटी, रविवारी 5.30 कोटी आणि सोमवारी 2.86 कोटींची कमाई केली आहे. एकूण सिम्बाने देशातच 228 कोटीं कमावले आहेत. जर याचप्रमाणे सिम्बा आणखी काही दिवस चालला तर लवकरच हा चित्रपट 250 कोटींच्या घरात प्रवेश करेल असे आदर्श यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.