
घर स्वच्छ, नीटनीटके आणि स्वच्छ ठेवावे असे आपल्याला वाटते. पण घर इतकं नेटके कसे ठेवावे, हा प्रश्न आपल्याला पडतो. घरातल्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी मोठे बास्केट खरेदी करा. उदारहणार्थ लहान मुलांची खेळणी, कपडे, रुमाल, टॉवेल, सॉक्स असे लहान कपडे यांच्यासाठी त्यांच्या आकारानुसार झाकण असलेले बास्केट खरेदी करा.
कपाटांमध्ये कपडय़ांसाठी ऑर्गनायझर आणून ठेवा. घरात जास्तीच्या वस्तू मुळीच घेऊ नका. यामुळे गरज नसतानाही खूप जागा अडली जाते. घराचा हॉल नेहमी सुटसुटीत मोकळा ठेवा. स्वयंपाकघर, गॅस, किचन ओटा, डायनिंग टेबल आणि सिंक नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.





























































