
सामना प्रतिनिधी । कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास नियंत्रण नियमावली बाबत चर्चा करण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना विविध नियम अटींमुळे उद्दभवणाऱ्या समस्या, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका यांना येणाऱ्या अनेक अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
या समस्या अडचणी सोडविण्यासंदर्भात नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सकारात्मकता दर्शविली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नगरविकास प्रधान सचिव नितीन करीर, कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर, सचिन वालावलकर, बांधकाम व्यावसायिक गजानन कांदळगावकर, जैतापकर, शिरसाट, व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






























































