अवघे जग चिंतेत, सिंगापूर मात्र बिनधास्त; कोरोनासोबतच आता जगायचंय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात हाहाकार उडवून देणारे कोरोना महामारीचे संकट उत्तम प्रकारे हाताळणाऱया सिंगापूरमध्ये दैनंदिन जीवनात मोठे फेरबदल केले जाणार आहेत. कोरोनाला नष्ट करणे शक्य नसल्याने कोरोनासोबतच जगण्याचा निर्धार करत देशात ‘ओपन टू ऑल’चं धोरण सिंगापूरमध्ये राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर होणार नाही, की कोरोनाच्या भीतीने कुणालाही क्वारंटाइन केलं जाणार नसल्याची घोषणा सिंगापूर सरकारने केली आहे.

कोरोनाला घाबरून न जाता दैनंदिन जीवनात एखाद्याला ताप आला पिंवा एखाद्या साथीच्या आजाराला तोंड दिलं जातं त्याच पद्धतीने सिंगापूरमध्ये यापुढे कोरोना महामारीचं संकट हाताळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंग, योंग आणि वोंग या सिंगापूरच्या मंत्र्यांद्वारे देशात आणल्या जाणाऱया ‘ओपन टू ऑल’ च्या प्लाननंतर गोष्टी बदलतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही मंत्री देशाच्या कोविड-10 मल्टी-मिनिस्ट्री टास्क पर्ह्सचे सदस्य आहेत.

सिंगापूरचे वाणिज्यमंत्री गान किम योंग, अर्थमंत्री लॉरेंस वोंग आणि आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी ‘स्ट्रेट्स टाइम्स’मध्ये एक संपादकीय लेख लिहिला होता. यात कोरोना जगातून कधीच जाणार नाही ही वाईट बातमी आहे, आणि चांगली बातमी अशी की, या विषाणूसोबतच जगण्याची पद्धत आपण अंमलात आणू शकतो, असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये सध्या लागू असलेले निर्बंध शिथिल करत ‘न्यू नॉर्मल लाइफ’च्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

– यात्रेकरूंना क्वारंटाइन करण्यात येणार नाही आणि कोरोनाबाधित रुग्णाच्या संपका&त आलेल्या रुग्णालाही आयसोलेट करण्यात येणार नाही, अशी घोषणा सिंगापूरनं केली आहे.

– कोरोना रुग्णांची आकडेवारी जारी करण्यात येणार नाही. असं असलं तरी नागरिकांना दुकानात किंवा कार्यालयात जाण्यासाठी कोरोनाची चाचणी करण्याचा नियम यापुढेही कायम राहणार आहे.

दररोज आढळतात 20 ते 30 नवे रुग्ण

इतर देशांप्रमाणेच सिंगापूरमध्येही गेल्या वर्षी कोरोनाची लाट आली होती. एप्रिलच्या मध्यापर्यंत दररोज 600 रुग्णांची वाढ होत होती. ऑगस्टमध्ये लाट ओसरल्यानंतर सिंगापूरमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त दिसून आलेला नाही. केवळ 57 लाख लोकसंख्या असेलल्या सिंगापूरमध्ये दररोज 20 ते 30 नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत देशात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.