कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरण, 7 पैकी 6 आरोपी दोषी

law

सामना ऑनलाईन । पठाणकोट

जम्मू-कश्मीरमधील कठुआतील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामसह पोलीस अधिकारी दिपक खजुरीया आणि सुरेंद्र वर्मा, पोलीस हेडकॉन्सटेबल तिलक राज व इतर अशा 6 आरोपींना पंजाबच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. इन कॅमेरा चाललेल्या खटल्याची सुनावणीत प्रकरणी निकाल देण्यात आला आहे. दोषी आरोपींना दुपारी 2 वाजता शिक्षा सिनावण्यात येणार आहे.

देशभर गाजलेल्या जम्मूमधील कठुआ येथील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार हत्या प्रकरणाची सुनावणी पंजाबमधील पठाणकोट येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी जम्मू-कश्मीरबाहेर करावी अशी मागणी या घटनेतील मृत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी केली होती. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या