मेघालयमध्ये कोळशाच्या खाणीत पडून 6 मजुरांचा मृत्यू, खाण बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट

मेघालयमध्ये एका कोळसा खाणीत पडून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही खाण बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मेघालयच्या पूर्ण जेनतिया पर्वतरांगांमध्ये एका कोळसा खाणीत काम सुरू होते. तेव्हा सहा मजूर 150 फूट खाली पडले. या दुर्घटनेत सहाही मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर मूळचे आसामचे होते. कामानिमित्त मेघालयमध्ये आले होते.  सरकारने दिलेल्या माहितीनुसार या भागात कुठलीच खाण नाही. हे मजूर दगड फोडण्याचे काम करत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या