
वय हा फक्त एक आकडा असतो. कोणत्याही वयात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जिद्दीने करायचं ठरवलं की कशाचाच अडथळा जाणवत नाही. अगदी सुसाट धावता येतं. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा साडी नेसून स्केटिंग करतानाचा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर आपण अनेक लोकांना काैशल्यपूर्ण स्केटिंग करताना बघितले आहे. मात्र स्केटिंग आणि तेही साडी नेसून… जरा अजबच वाटतंय ना… मात्र 46 वर्षांच्या महिलेने साडीतलं स्केटिंग करून सर्वांना थक्क करून सोडलंय. ओर्बी रॉय असे या महिलेचे नाव असून त्या टोरॅंटो येथे राहतात. बऱयाचदा त्या स्केटिंगचे व्हिडियो शेअर करत असतात. साडी हा पारंपरिक पेहराव घालून त्यांनी शेअर केलेला स्केटिंगचा व्हिडियो नेटिजन्सला आवडला आहे. ते ओर्बा रॉय यांचे भरभरून काwतुक करत आहेत.



























































