आजपासून बॅडमिंटनच्या कोर्टवर स्मॅशेसची फटकेबाजी

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘खेळ महोत्सवां’तर्गत येत्या 13 व 14 डिसेंबरला वडाळा स्पोर्ट्स क्लब येथे बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने कोर्टवर स्मॅशेसची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.

युवा खेळाडूंना त्यांच्या बॅडमिंटन काwशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी आणि आपल्या प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हाच या खेळ महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. दोन दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणाऱयांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि आकर्षक रोख बक्षिसे तसेच सन्मान जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. खासदार अनिल देसाई यांनी या स्पर्धेमध्ये परिसरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.