
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या महिला वन डे क्रमवारीत हिंदुस्थानची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिने पुन्हा एकदा ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले आहे. या मराठमोळय़ा खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ट हिला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. मानधनाचे रेटिंग गुण 790 असून, वोल्वार्टचे 782 गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत स्मृती मानधनाने 58 आणि 31 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळय़ा साकारल्या होत्या. दरम्यान, गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन हिला मागे टाकत ऑस्ट्रेलियाची अलाना किंग अव्वल स्थानी पोहोचली आहे.


























































