
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी मागील तीन महिन्यांपासून कर्मचाऱयांचा संप सुरूच आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण नऊ आगारांतून एसटीची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सोलापूर विभागातील एकूण 600 एसटी बसपैकी 200 गाडय़ा धावत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱयांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाला तीन महिने उलटून गेले तरीही कर्मचारी संप सुरू आहे. राज्य शासनाने पगारामध्ये भरघोस वाढ देऊनही संपकरी कामावर परत येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर आगारात एकूण 20 खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आल्याने एसटीच्या चाकांना गती मिळत आहे.
एसटी कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून संपाकर आहेत. ग्रामीण भागाची मोठी मदार एसटीवर असल्याने या भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे. त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असून, शेतकरी, रुग्णांना त्याची झळ पोहोचली आहे. याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या एसटीची काहतूक हळूहळू काढत असून, सहाशे बसपैकी दोनशे बस धावत आहेत. येत्या काळात आणखी गाडय़ा काढविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती सोलापूरचे विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांनी दिली.
साताऱ्यातून 298 फेऱ्या
एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 3 महिन्यांपासून संप सुरूच आहे. मात्र, सातारा विभागातून सुमारे 298 एसटीच्या फेऱया ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावर धावल्या.
महामंडळाने कर्मचाऱयांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा विभागातील विविध आगारांत कर्मचारी हजर झाले. त्यानुसार विविध आगारांतून पुणे, स्वारगेट, मुंबई, बोरिवली, सोलापूर, चिपळूण या मार्गांवर बसेस धावत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
सातारा विभागातील सातारा आगारातून 65 बसेसच्या 84 फेऱयांमधून 1 हजार 817 प्रवाशांनी प्रवास केला. कराड आगाराच्या 14 बसेसच्या 36 फेऱयांतून 1 हजार 77, कोरेगाव आगाराच्या 5 बसेसच्या 9 फेऱयांतून 521, फलटण आगाराच्या 5 बसेसच्या 8 फेऱयांतून 288, वाई आगाराच्या 5 बसेसच्या 24 फेऱयांतून 936, पाटण आगाराच्या 16 बसेसच्या 48 फेऱयांतून 1 हजार 217, दहिवडी आगाराच्या 5 बसेसच्या 14 फेऱयांतून 445, महाबळेश्वर आगाराच्या 10 बसेसच्या 16 फेऱयांतून 483, मेढा आगाराच्या 2 बसेसच्या 13 फेऱयांतून 366, पारगाव खंडाळा आगाराच्या 3 बसेसच्या 11 फेऱयांतून 282, वडूज आगाराच्या 16 बसेसच्या 35 फेऱयांतून 1 हजार 315 अशा मिळून 146 बसेसच्या 248 फेऱयांच्या माध्यमातून 8 हजार 747 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती विभागीय कार्यालयातून देण्यात आली.






























































