काँग्रेस गाढवांचा पक्ष – प्रकाश आंबेडकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सोलापूर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे, राजकारण व निवडणुकांत ते गाढवपणा करणारच अशी टीका सोलापूर लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केला. भेटीचे राजकारण करणाऱया काँग्रेसला निवडणुकीत मतदार धडा शिकवतील असा हल्लाही यावेळी त्यांनी केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश यशवंत आंबेडकर यांची सोलापुरातील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भेटीची सध्या सोलापुरात चांगलीच चर्चा रंगली असून या भेटीच्या फोटोवरून राजकारणही तापले आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा फोटो व्हायरल करत काँगेसने लाभ उठविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या व्हायरल फोटोवरून प्रकाश आंबेडकर भलतेच चिडले आहेत.