
लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणीचे अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सुनीता लक्ष्मण कुसेकर असे खून झालेल्या मुलीचे नाव असून, याप्रकरणी ज्योतिबा अशोक गायकवाड (रा. विक्रांतनगर, अक्कलकोट रोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
ज्योतिबा गायकवाड याने नातेवाईक असलेल्या कुसेकर यांच्या घरी जाऊन सुनीताला लग्नासाठी मागणी घातली होती; परंतु सुनीताच्या कुटुंबीयांना मुलगी लहान असल्याने व शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नाचा विचार करू, असे सांगितले. याचा राग मनात धरून सुनीता क्लासला गेल्यावर तिचे अपहरण करून ज्योतिबाने तिचा खून केला होता.
































































