सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्प्रेस 11 फेब्रुवारीपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिद्धेश्वर एक्स्प्रेस (उद्यान एक्स्प्रेस) रेल्वेनंतर आता मुंबईला जाण्यासाठी सोलापूरकरांना 18 डब्यांची ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस असणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 6.05 काजता मुंबईला निघेल आणि दुपारी साडेबारापर्यंत मुंबईत पोहचेल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.

सोलापूर-मुंबई आणि मुंबई- शिर्डी (साईनगर) अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही गाडय़ांना हिरवा झेंडा दाखकणार आहेत. वंदे भारत रेल्वेत दिव्याग प्रकाशांसाठी क्हीलचेअरची सुविधा असणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या अन्य रेल्वेगाडय़ांच्या तुलनेत ‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांसाठी भरपूर सोयी असणार आहेत. त्या गाडीत स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते.

सोलापूरकरांना ‘वंदे भारत’च्या माध्यमातून खूप वर्षांनी मुंबईसाठी सकाळची रेल्वे उपलब्ध होणार आहे. पण, ही रेल्वे नियमित असणार का, मुंबईहून निघताना रेल्वेची वेळ कोणती असेल, या संदर्भात अजून काहीच स्पष्टता नाही. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची या संदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीनंतर ‘वंदे भारत’ संदर्भातील वेळापत्रक स्पष्ट होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱयाने  सांगितले.

सध्या श्री सिद्धेश्वर एक्स्प्रेस रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी मुंबईला निघते. ती दुसऱया दिवशी सकाळी साडेसहा वाजता मुंबईला पोहचते, तर हुतात्मा एक्स्प्रेस सकाळी साडेसहा वाजता सोलापुरातून निघते, पण ही रेल्वे पुण्यापर्यंतच आहे.

आता ‘वंदे भारत’मुळे सोलापूरकरांना सकाळी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत जाता येणार आहे. ही रेल्वे मुंबईहून दुपारी चार वाजून 10 मिनिटांनी निघेल आणि रात्री पावणेअकरा वाजता सोलापुरात पोहचणार आहे. ‘वंदे भारत’चा वेग ताशी 180 किमी आहे, पण सध्या तसा ट्रक नसल्याने तो वेग कमीच राहील, असे सांगितले जात आहे.