
खर्चात बचत करून कामात सुसूत्रता यावी या हेतूने सोलापूर महापालिकेने नवा आकृतिबंध तयार केला आहे. त्यामध्ये आठ विभागीय अधिकाऱ्य़ांना सहायक आयुक्तांचा दर्जा दिला जाणार असून, अभियंत्याच्या सोबतीला आता सहायक कनिष्ठ अभियंता हे पद निर्माण केले आहे. भूमापक हे पद रद्द केले असून, शिपाई, लिपिक, मजूर, रोडरोलर चालक, मुकादम जमादार अशी जवळपास 650 पदे रद्द केली जाणार आहेत.
महापालिकेला दरवर्षी उद्दिष्टानुसार महसूल मिळालाच नाही. मागील चार-साडेचार वर्षांत उद्दिष्टानुसार महापालिकेच्या उत्पन्नात अकराशे कोटींची तूट सोसावी लागली आहे. आस्थापनावरील खर्च कमी व्हावा, कमी मनुष्यबळात दर्जेदार काम व्हावे, असा आकृतिबंध तयार केल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यात लिपिक, शिपाई व मजुरांची अंदाजित 500 पदे रद्द केली आहेत. त्यांची कामे आता संबंधित मक्तेदारांमार्फत केली जाणार आहेत. सहायक आयुक्तांची 40 पदे नव्याने भरण्यास मान्यता द्यावी, आठ विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्य़ांना सहायक आयुक्तांचा दर्जा द्याका, मुकादम जमादार, भूमापक अशी पदे रद्द करावीत, असे त्या आकृतिबंधातून स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या आकृतिबंधानुसार जकळपास बाराशेपैकी 650 पदे रद्द होणार असून, या निर्णयामुळे आगामी काळात नगरसेकक, कामगार संघटना आणि प्रशासनातील काद काढेल, अशी शक्यता कर्तकिली आहे.
नव्या आकृतिबंधानुसार हा वशिलेबाजीचा प्रकार बंद होणार आहे. अर्ज मागवून परीक्षा पद्धतीनेच योग्य उमेदवारांची निवड होणार आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर महापालिकेतर्फे पदभरती काढली जाणार आहे. त्यामध्ये अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, सहायक आयुक्त अशा पदांची वाढ होणार आहे. परीक्षेतून पारदर्शक पद्धतीने उमेदकारांची निवड होणार आहे.
तृतीय, चतुर्थ श्रेणीतील पदे कमी होणार
शहरातील विविध भागांतील जमीन अथवा जागांची मोजणी करणे, अतिक्रमण झालेल्या जागेची मोजणी करणे, अशा प्रमुख कामांसाठी भूमापक पदाची निर्मिती झाली. मात्र, आता भूमापक हे पद रद्द करण्यात आले आहे. या विभागाच्या अभियंत्याच्या जोडीला कनिष्ठ सहायक अभियंता दिला जाणार आहे. मजूर, लिपिक, शिपायांची पदेही कमी करण्यात आल्याने मुकादम जमादार हे पद रद्द करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, शहरातील सर्कच प्रकारची कामे स्वतः महापालिकेतर्फे केली जात होती. मात्र, आता ठेकेदारांवरच महापालिकेला अवलंबून राहावे लागत असल्याने या पदांची गरज नसल्याचे आकृतिबंधातून दाखविण्यात आले आहे. त्यामुळे तृतीय व चतुर्थश्रेणीतील बरीच पदे कमी होणार आहेत.



























































