
शहर व जिल्ह्यात लसीकरणासाठी गर्दी काढत असल्याने जिल्ह्यासाठी साडेसहा लाख डोस द्याकेत, अशी मागणी नोंदविण्यात आली. यातील एक लाख डोस मिळाल्यानंतर सर्वच लसीकरण केंद्रांवर पूर्णवेळ मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. मात्र, आज 19500 डोस मिळाले असल्यामुळे उपलब्ध लसीचा जपून वापर केला जात असल्याची माहिती लसीकरणाचे समन्कयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाखांवर असतानाही जिल्ह्यात अवघी 126 लसीकरण केंद्रेच सुरू झाली आहेत. तरीही या केंद्रांना पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरात 27, तर जिल्ह्यात 99 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. या केंद्रांसाठी आठवडय़ातून एकदा 20 ते 30 हजार डोस मिळत असल्याने काही केंद्रे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शहर आणि जिल्ह्यासाठी गुरुवारी 19 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत.
























































