Solapur News- विठुरायाचे दर्शन घेऊन परतताना भाविकांच्या कारला भीषण अपघात, 14 वर्षाच्या मुलासह तिघांचा मृत्यू

पंढरपूरात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन महिला व एका 14 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यामध्ये चारही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक मुंबईची असल्याचे प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अपघात स्थळी पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविकांची गाडी मंगळवेढा मार्गे पुढील प्रवासासाठी जात असताना मंगळवेढा येथील ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने कट मारल्याने भाविकांची गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. यामध्ये तीन महिलांसह एका 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर अन्य पाच ते सहा भाविक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपुर ते सोलापुर जाणारे हायवे रोडवर ,शरद नगर , मल्लेवाडी ता.मंगळवेढा जि.सोलापुर या ठिकाणी कंटेनर ट्रक क्रमांक एच एच 46BU – 6651 चा चालक युवराज यशवंत गळवे याने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन,भरधाव वेगाने, हयगयीने रॉंग साइडने चालवून क्रुजर जीप क्र.एम एच 13 बी एन 7687 ला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात अंजली यादव, सोहम घुगे व इतर सहाजणांना जखमी झाले आहेत. तर योगिनी केकाणे, सोनम अहिरे,आदित्य गुप्ता, सविता गुप्ता, यांचा मृत्यू झाला आहे.