भाजपच्या नगरसेवकांचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष, सोलापूर महापौरांच्या दालनात महिलांचा ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरी सुविधांच्या प्रश्नावर शहरातील काही महिलांनी आज महापौरांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. प्रभागातील भाजपच्या नगरसेविका शशिकला बत्तूल यांच्यासह इतर दोन नगरसेवकांविरुद्ध आरोप करीत त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, या घटनेने पालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता.

प्रभाग क्रमांक 12 मध्ये गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही नागरी सुविधा न देता कर वसूल केला जात आहे. रस्ते, गटारे व पाण्याची सुविधा नाही. ऐन पावसाळ्यात गटारे तुंबली असून, रस्त्यावर पाणी साचले आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून, वृद्ध व लहान मुले आजारी पडत आहेत. या प्रभागातील भाजपच्या नगरसेवकांकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने काही महिला मुलांना घेऊन थेट पालिकेतील महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या दालनासमोर आल्या होत्या. तेथे कर्मचाऱ्य़ांनी रोखून धरत दमबाजी सुरू केली. त्यामुळे महिलांनी दालनातच ठिय्या आंदोलन केले.