
जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात कृपादृष्टी दाखविली असून, सोलापूर जिह्यात सरासरीच्या 123 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांचा टक्का वाढला असून, पाणीसाठय़ातही वाढ झाली आहे. जुलै महिन्यात सरासरी पावसाच्या सव्वापट जास्त पाऊस झाला आहे.
जून महिन्यात सरासरी पावसाच्या फक्त 84 टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पाकसामुळे खरीप हंगामातील पेरणीचा टक्का काढला आहे. शासन दरबारी झालेल्या नोंदीनुसार जून महिन्यात 102 मि.मी. अपेक्षित असताना 87 मि.मी. तर जुलै महिन्यात 94 मि.मी. अपेक्षित असताना 156 मि. मी. पाऊस झाला आहे.
जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. दक्षिण सोलापूर, माळशिरस व करमाळा वगळता इतर तालुक्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस होता. उत्तर सोलापूर तालुक्यात 213 टक्के, बार्शी तालुक्यात 200 टक्के, अक्कलकोट तालुक्यात 177 टक्के तर करमाळा तालुक्यात 174 टक्के पाकसाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतचा सर्वात कमी 73.60 टक्के पाऊस सांगोला तालुक्यात झाला आहे, तर सर्वाधिक 146 टक्के पाऊस बार्शी तालुक्यात झाला आहे.
जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीप पिके संकटात आली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. जुलैच्या पावसाने समाधान दिले आहे. पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाच जिह्यांत आतापर्यंत 433 मि.मी. 82.40 टक्के पाऊस झाला आहे.


























































