सोलापूरच्या सोहमचा लघुपट जगात सर्वोत्तम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर येथील सोहम येमूल या 9 वर्षे कयाच्या मुलाने नुकत्याच लंडन येथे झालेल्या नेव्हर सच इनोसन्स (एनएसआय) संस्थेम़ार्फत घेतलेल्या कोविड -19 रिस्पॉन्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन या स्पर्धेत 40 देशांतील 4 हजार स्पर्धकांमधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांने बाहुल्यांचा वापर करून बनविलेल्या लघुपटाचे या स्पर्धेत कौतुक झाले. तेथील दामिनी विद्या मंदिर शाळेचा तो विद्यार्थी आहे. एनएसआय या संस्थेने नुकतीच कोविड -19 रिस्पॉन्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही स्पर्धा जागतिक स्तरावर आयोजित केली होती. आपल्या आई-वडिलांच्या मदतीने सोहमने एक लघुपट बनवून या स्पर्धेत भाग घेतला होता. या लघुपटात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाहुला, तसेच कोरोना बाहुला व अन्य बाहुल्यांचा वापर केला होता. गेल्या वर्षी सोहमने हिंदुस्थानातील सर्वात लहान केंटरिओक्किस्ट आणि स्ट्रिंग पपेटर म्हणून विक्रम नोंदविला आहे. त्याचा या स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने तो सर्कांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.