सोमय्या नर्सिंग कॉलेजकडून 12 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

ऑफलाईन प्रवेश देण्याचे अधिकार नसतानाही सोमय्या महाकिद्यालयाने नर्सिंग अभ्यासक्रमाला 12 किद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. आता ते प्रवेश विद्यार्थ्यांनी स्वतः रद्द करावेत यासाठी कॉलेजकडून त्यांच्याकर दबाव आणला जात आहे.

नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्यामध्ये सीईटी परीक्षेमार्फत होतात. सीईटीनंतर नर्सिंग प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र त्यादरम्यान के. जे. सोमय्या ऑफ नर्सिंग या महाविद्यालयाने 12 विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रवेश दिले. त्या विद्यार्थ्यांनीही संपूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतला. ते उपस्थितही राहत आहेत. पण ऑनलाईनची तारीख वाढवल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांवर त्यांचे प्रवेश रद्द करण्यासाठी दबाव सुरू झाला आहे. चार विद्यार्थ्यांनी त्या दबावाला कंटाळून आपले प्रवेश रद्द केले आहेत. अन्य विद्यार्थी तसे करण्यास तयार नसल्याने त्यांचा मानसिक छळ केला जात आहे.

कॉलेजवर गुन्हा नोंदवण्याची मागणी
सोमय्या प्रशासनाच्या छळाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी युवा सेनेशी संपर्क साधला. युवा सेनेचे सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे तक्रार केली आहे. अधिकार नसतानाही ऑफलाईन प्रवेश देणाऱ्या के. जे. सोमय्या ऑफ नर्सिंग महाविद्यालयावर गुन्हा दाखल करावा आणि ऑफलाईन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द न करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी अॅड. थोरात यांनी डॉ. शिनगारे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

महाविद्यालय सोडण्यासाठी सक्ती करतानाच सोमय्या नर्सिंग महाविद्यालयाने त्यांना खाजगी नर्सिंग महाविद्यालयांची एक यादीही दिली आहे. त्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घ्या असे सांगितले जात आहे. धक्कादायक म्हणजे ती सर्व महाविद्यालये ही मुंबईच्या बाहेरची आहेत. त्यात बुलढाण्यातील व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग, संगमनेरचे वामनराव इथापे नर्सिंग कॉलेज, धुळ्याचे सेवा नर्सिंग इन्स्टिटय़ूट, भंडाऱ्याचे अरोमिरा कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूरचे दत्ता मेघे नर्सिंग कॉलेज, संभाजीनगरचे धनेश्वरी नर्सिंग कॉलेज आणि हिंगोलीतील माऊली नर्सिंग कॉलेजचा समावेश आहे.

summary- somaiyya college illegally admissions medical students