व्हॉट्सऍपवरून जुने मेसेज गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जगभरात सर्वाधिक वापरात असलेल्या व्हॉट्सऍपवर आता एक नवीन समस्या उद्भवली आहे. बहुसंख्य युजर्सच्या व्हॉट्सऍपवरून जुने चॅट, मेसेज गायब होत आहेत. अनेक युजर्सनी ट्विटरसमवेत अन्य ऑनलाइन साईडवरून याविषयी तक्रार केली आहे.

एका युजर्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सऍपवरील जुने मेसेज गायब होत आहेत. रोज सकाळी एक किंवा दोन चॅट उडालेले असतात. गुगल सर्च केल्यावर अन्य काही युजर्ससोबतही हाच प्रोब्लेम झाल्याचे समजले.’ या युजर्सनी व्हॉट्सऍप सपोर्ट टीमशी  संपर्क साधला, पण त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही.

असे वाचवा जुने मेसेज

व्हॉट्सऍपवरून जुने मेसेज का गायब होतायत, याचे कारण अद्यापही उघड झालेले नाही. परंतु व्हॉट्सऍप चॅटचे बॅकअप घेतल्यास मेसेज डिलीट होण्यापासून वाचतील. गुगल ड्राइव्हव्हर जाऊन तुम्ही बॅकअप घेऊ शकता.

असा घ्या बॅकअप

  • फोनमध्ये व्हॉट्सऍप ओपन करा.
  • मेनूमध्ये जाऊन सेटिंग ऑप्शनवर क्लिक करा.
  • सेटिंगमधील चॅटमध्ये जाऊन चॅट ऑप्शनवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला Back up to google drive हा पर्याय दिसेल.
  • तो सिलेक्ट करून तुम्ही बॅकअप घेऊ शकता.