भयंकर! जमिनीच्या वादावरून मुलाने आईला जिवंत जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। ओदिशा

संपत्तीच्या वादावरून एका नराधम मुलाने (30) आईला जिवंत जाळल्याची भयंकर घटना ओदिशा येथे घडली आहे. गीता मंडल (55) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरोपी मुलाचा आईबरोबर पैसे व जमिनीवरून वाद होत असे. शनिवारीही त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी संतप्त झालेल्या मुलाने आईला लाथा बुक्कयांनी मारहाण केली. त्यात आई अर्धमेली झाल्याचे बघून मुलाने तिच्या अंगावर रॉकेल ओतले व तिला पेटवून दिले. शेजारच्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी मुलाला अटक केली.

.