‘दारू पिण्यासाठी पैसे दे’ म्हणत मुलानेच बापाचे दगडाने फोडले डोके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, लातूर

दारू पिण्यासाठी बापाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून मुलाने दगडाने बापाचे डोके फोडल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील सलगरा येथे घडली. या मारहाण प्रकरणी अशोक दिगंबर मोरे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फिर्यादी हा घरी असताना मुलगा बाळू अशोक मोरे याने त्यांना दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. फिर्यादीने पैसे नाहीत असे म्हटले असता तू पैसे देतो का नाही म्हणून शिवीगाळ केली. दगडाने डोक्यात मारुन डोके फोडले. फिर्यादीची पत्नी प्रभावती ही भांडण सोडवण्यासाठी आली असता मुलाने त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐवूâन शेजारी धावत आले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या मुलाच्या तावडीतून पती – पत्नीची सुटका केली.