या कपड्यात भिकारीण दिसतेस! जेव्हा Ripped साडीवरून सोनम झाली होती ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम कपूर ही अभिनेत्री बॉलिवूडची फॅशनिस्टा मानली जाते. नेहमी काहीतरी हटके पेहराव करणं हे सोनमचं वैशिष्ट्य आहे. पण, सोनम तिच्या एका साडीवरून ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

सोनम नवनवीन फॅशन डिझायनर कडील कपडे अगदी उतम कॅरी करते. नेहमी पेक्षा वेगळं दिसायचा तिचा प्रयत्न असतो. अगदी स्वतःच्या लग्नातला आणि त्यानंतर कान्समधला तिचा पेहराव चर्चेचा विषय ठरला होता. पण तिच्या एका साडीवरून मात्र ती चांगलीच ट्रोल झाली होती. आपल्या वीरे दी वेडिंग या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिने ही साडी नेसली होती.

या चित्रपटाच्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमादरम्यान सोनमने एक डेनिमची साडी परिधान केली होती. दीक्षा खन्ना नावाच्या डीझायनरने बनवलेली ही साडी पावडर ब्लू रंगाच्या डेनिमच्या कापडापासून तयार केली होती. तिने पांढऱ्या रंगाच्या शर्टसोबत ही साडी नेसली होती. साडीचा प्रकार सेमी ड्रेप पद्धतीचा होता. पण त्याच्या पदरावर जे रिप्ड जीन्स सारखं डिझाईन होतं, त्याने तिच्या लूकची पार वाट लावली.

साडीला झालर असावी तसा डेनिमच्या रिप्ड धाग्यांचा वेगळा काठ या साडीच्या पदराला होता. रिप्ड जीन्स ही आधीच अनेकांसाठी फाटकी जीन्स म्हणून खिल्लीचा विषय आहे. त्यात सोनमने साडीत अशी फॅशन केल्याने नेटकऱ्यांना आयती संधी सापडली. त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी यथेच्छ टोमणे मारले. अशा फाटक्या साडीत भिकारीण दिसतेस, या भाषेत तिला ट्रोल केलं गेलं. फॅशन आयकॉन असलेल्या सोनमकडून लोकांना ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला जरा बरे कपडे घालत जा, असा सल्लाही दिला.