अनिल कपूरही विचारतोय, अच्छे दिन कब आयेंगे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभरातील जनतेला ‘अच्छे दिन कधी येणार’ असा प्रश्न पडलेला असताना अभिनेता अनिल कपूर याला देखील सध्या हाच प्रश्न भेडसावत आहे. त्याने एका गाण्यातूनच सर्वांना ‘ मेरे अच्छे दिन कब आयेंगे?’ असा सवाल केला आहे. हे गाणे अनिल कपूर याचा आगामी चित्रपट फन्ने खाँमधील असून यात अनिलने हा प्रश्न विचारला आहे.

‘फन्ने खाँ’ या चित्रपटातून अभिनेत्री ऐश्वर्या राय व अभिनेता अनिल कपूर तब्बल १७ वर्षानंतर एकत्र येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत या दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आज अनिल कपूरने या चित्रपटातील एक गाणे सोशल मीडियावर रिलीज केले आहे. या गाण्यातून हताश झालेला अनिल कपूर ‘ मेरे अच्छे दिन कब आयेंगे?’ असा प्रश्न विचारत आहे. हे गाणे रिलीज करताना त्याने ‘जर स्वप्न बघितली आहेत तर चांगले दिवस नक्की येतील असा विश्वास ठेवा’ अशी पोस्ट देखील शेअर केली आहे.