वैभव सूर्यवंशीने मोडला सचिनचा ऐतिहासिक विक्रम! वयाच्या 15 व्या वर्षी केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटला आणखी एक ‘वंडर बॉय’ मिळाला आहे. बिहारच्या अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच इतिहास रचला. 15 वर्षे, 3 महिने आणि 7 दिवसांतच हिंदुस्थानकडून पदार्पण करणारा तो सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला. या कामगिरीसह त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडत इतिहास घडविला.

तिलक वर्माच्या हस्ते वैभवला पहिली आंतरराष्ट्रीय कॅप प्रदान करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानी संघाने त्याचे अभिनंदन करत हा क्षण संस्मरणीय बनवला. वैभवने पहिल्याच सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी केली खरी, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. वैभवने पदार्पणाच्या सामन्यात 10 चेंडूंत 2 षटकारांच्या जोरावर 14 धावा केल्या.

हिंदुस्थानकडून सर्वात कमी वयात पदार्पण करणारे क्रिकेटपटू

वैभव सूर्यवंशी – 15 वर्षे 99 दिवस

शेफाली वर्मा – 15 वर्षे 239 दिवस

सचिन तेंडुलकर – 16 वर्षे 206 दिवस

पार्थिव पटेल – 17 वर्षे 152 दिवस

हरभजन सिंग  – 17 वर्षे 288 दिवस

युवराज सिंग – 18 वर्षे 124 दिवस