सौरव गांगुलीवर बायोपिक! मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरचे नाव चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती होणार आहे. चर्चेनुसार यात अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या बायोपिकचे बजेट 200 ते 250 कोटी असणार आहे.

Photo – गांगुलीच नाही तर ‘या’ खेळाडूंवरही बनला आहे बायोपिक

सौरव गांगुलीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, ‘‘बायोपिकसाठी मी ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र अजून दिग्दर्शकाचं नाव सांगणं शक्य नाहीय. सर्वकाही निश्चित होण्यास वेळ लागेल.’’ सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. सौरवच्या प्रोडक्शन हाऊससोबत अनेक मीटिंगदेखील झाल्या आहेत. मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूरचे नाव सर्वात टॉपवर आहे. या लिस्टमध्ये आणखी दोन अभिनेत्यांची नावे आहेत. त्यापैकी एक नाव हृतिकचे असल्याचे बोलले जातेय. बॉलिवूडमध्ये आगामी काळातदेखील क्रिकेटपटूंवर बायोपिक भेटीला येणार आहेत. यात रणवीर सिंहचा ‘83’ आणि तापसी पन्नूचा ‘शाबास मितू’ यांचा समावेश आहे. 83मध्ये रणवीर माजी कर्णधार कपीलदेव यांची भूमिका साकारतोय तर शाबास मितूमध्ये तापसी महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची भूमिका साकारतेय.