‘मी अर्जुन तेंडुलकरला खेळताना पाहिलं नाही, पण…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याची हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. हिंदुस्थानचा युवा संघ जुलै ते ऑगस्ट या कालावधीत श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून यादरम्यान दोन चारदिवसीय व पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत सहभागी होणार आहे. यावर दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला दादा?

सौरव गांगुलीला अर्जुन तेंडुलकरच्या अंडर-१९ संघामध्ये निवडीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने अर्जुनला शुभेच्छा दिल्या. गांगुलीने म्हटलं की, ‘मी अजून अर्जुनला खेळताना पाहिलं नाही. पण मला आशा आहे की तो चांगली कामगिरी करेल.’

सचिनचा मुलगा अर्जुन हा वेगवान गोलंदाज असून मध्यक्रमात चांगली तो बॅटींगही करतो. अर्जुन तेंडुलकरने हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचे धडे घेतले आहे. बीसीसीआयच्या धर्मशाला येथील फास्ट बॉलरच्या शिबिरात देखील तो सहभागी झाला होता.