Pushpa – ‘पुष्पा 2 सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अल्लू अर्जुनने केली घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन बऱ्याच दिवसांपासून ‘पुष्पा 2 द रुल’ या आगामी सिनेमामुळे लाईमलाईटमध्ये आला आहे. ‘पुष्पा: द राइज’ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर ‘पुष्पा 2’ ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 500 कोटींच्चा बजेटमध्ये तयार केलेली ‘पुष्पा 2 द रुल’ 15 ऑगस्टला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अल्लू अर्जुनने चाहत्यांना खूश करणारी बातमी दिली आहे. अल्लू अर्जुनने पुष्पा सिनेमाचा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा केली आणि तिसरा भाग हा बाकी दोन भागांपेक्षा वेगळा असेल असेही सांगितले.

पुष्पा सिनेमाच्या प्रदर्शनानंतर चाहते सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतित्क्षेत होते. पुष्पाचे मेकर्सही वेळेवर सिनेमाची अपडेट शेअर करत असतात. पुष्पा 2 नंतर पुष्पा 3 कधी येणार याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्याचवेळी अल्लू अर्जुनने पुष्पा सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. “तुम्ही निश्चितपणे तिसऱ्या भागाची वाट पाहू शकता, आम्हाला ही फ्रँचायझी बनवायची आहे आणि आमच्याकडे लाइन अपसाठी खूप मजेदार कल्पना आहेत.” आम्ही तुम्हाला सांगतो की ‘पुष्पा: द राइज 2021’ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाचे काम सुरू झाले. अल्लू अर्जुनने प्रकृतीच्या कारणास्तव ब्रेक घेतला होता पण आता  पुन्हा शूटिंग सुरू केले आहे.

आंध्र प्रदेशच्या जंगलात लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या कुलीबद्दल पुष्पा आहे. तो एका तस्करीच्या साम्राज्यावर कसा राज्य करतो यावर हा सिनेमा होता. त्याच्या दुसऱ्या भागात रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. फहद फासिल पोलीस अधिकारी भंवर सिंग शेखावत यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पुष्पा आणि भंवर सिंग यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.