दक्षिण मुंबईतील या दोन शाळांमध्ये आता मुलींनाही एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील शंभरहून वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या दोन शाळांमध्ये आता को-एड शिक्षण पद्धत राबवली जाणार आहे. या शाळांमध्ये आतापर्यंत फक्त मुलाांनाच प्रवेश दिला जायचा. मात्र आता मुलींना देखील प्रवेश दिला जाणार आहे. फोर्टला असलेल्या चॅम्पियन स्कूल व माझगावच्या सेंट मेरी या शाळांनी हा निर्णय घेतला आहे.

दक्षिण मुंबई व मध्य मुंबईतील अनेक मोठ्या शाळा या आतापर्यंत फक्त मुलांसाठी होत्या. यातील काही शाळांनी मधल्या काळात त्यांचे नियम बदल मुलींनाही शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यात वांद्रेची स्टेनिस्लोस, धोबी तलाव येथील सेंट झेवियर्स, फोर्टची पार्सी रन मायनॉरिटी, भरदा न्यू हायस्कूल या शाळांचा समावेश होता.

फोर्टला असलेल्या चॅम्पियन स्कूल या शाळेत रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, शशी थरूर, कुमार मंगलम, रिशी कपूर यांच्यासारखे दिग्गजांनी शिक्षण घेतले आहे.