दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अल्लू अर्जुन याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

‘मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मी होम आयसोलेट असून सर्व नियमांचे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी. तसेच घरीच रहा, सुरक्षित रहा आणि संधी मिळाल्यास कोरोना प्रतिबंधक लस नक्की घ्या. माझ्या शुभचिंतकांना विनंती आहे की काळजी करू नका, मी ठीक आहे’, अशी पोस्ट अल्लू अर्जुन याने केली आहे.

पूजा हेगडेही पॉझिटिव्ह

दरम्यान, अल्लू अर्जुनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री पूजा हेगडेही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

#Coronavirus बापरे! कोरोनाचे ‘हे’ नवीन लक्षण अधिकच घातक, डॉक्टरही झाले हैराण