
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणला चेन्नईच्या वेल्स विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल वेल्स विद्यापीठाने त्याला हा सन्मान दिला. राम चरणने शनिवारी सोशल मीडियावर पह्टो शेअर करून ही माहिती दिली. या पदवीदान समारंभाला राम चरण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होता. त्याने चाहत्यांचे आभार मानले.




























































