यूपी विधानसभेत राज्यपालांवर आमदारांनी कागदी बोळे भिरकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवस आज विरोधकांनी घातलेल्या प्रचंड गदारोळाने गाजला. भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधक बैल घेऊनच विधान भवनावर धडकले. विधानसभेत राज्यपाल राम नाईक हे अभिभाषण करीत असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी कागदी बोळे फेकून सभागृहात गोंधळ घातला. सरकारने केलेल्या कामांचा आढावा राज्यपाल घेत असताना सपासह इतर विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कागदाचे बोळे हवेत भिरकावले. ‘योगी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.